कुलगाममध्ये दोन ठिकाणी चकमक; सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांचा केला खात्मा

कुलगाममध्ये दोन ठिकाणी चकमक; सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांचा केला खात्मा

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रिसल चिन्निगाम भागात लष्कराच्या जवानांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रिसल चिन्निगाम भागात लष्कराच्या जवानांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मात्र, दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवानही शहीद झाला. जिल्ह्यात फ्रिसल चिन्निगम आणि मुदरगाम या दोन ठिकाणी चकमक सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख ही कारवाई संपल्यानंतरच कळणार आहे. विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी ही कारवाई केली. काश्मीर झोन पोलिसांनी सोशल मीडियावर या चकमकीची पुष्टी करताना पोलीस आणि सुरक्षा दल कारवाई करत असल्याचे लिहिले आहे. अधिक तपशील नंतर सामायिक केले जातील.

गेल्या एका महिन्यात (जून ते 6 जुलै) सुरक्षा दलांनी 10 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये डोडा येथे 11-12 जून रोजी सलग दोन दिवस दोन हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांचा आणि उरीमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा समावेश आहे.

कुलगाम जिल्ह्यातील एका गावात सुरक्षा दल आणि लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या भागात अलीकडच्या काळात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील विविध जिल्ह्यांमध्ये अनेक चकमकी झाल्या आहेत. गेल्या महिन्यातच सुरक्षा दलांनी डोडा जिल्ह्यातील गंडोह भागात 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर आता 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलेले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com