Dharashiv News
Dharashiv News

Dharashiv News : धाराशिवच्या कळंबमध्ये भाजप अन् काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा

धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून भाजप व काँग्रेसच्या उमेदवारास जोरदार राडा झाला.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून भाजप व काँग्रेसच्या उमेदवारास जोरदार राडा झाला असून दोन गटात जबर हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. प्रभाग सहा मधील भाजप उमेदवार सारिका वाघ यांचे पती रमेश वाघ यांना पैसे वाटताना काँग्रेस उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडले त्यानंतर गोंधळ झाला व त्यात बाजीपी उमेदवार ला काँगेस उमेदवार च्या मुलाने जबर मारहाण केल्याचा आरोप रमेश वाघ यांनी केला.

तर पेशाने डॉक्टर असलेल्या भाजप उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटपाला विरोध केल्याने 10 ते 15 भाजपच्याही कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मारहाण करून पाय मोडल्याचा आरोप काँगेसचे उमेदवार पांडुरंग कुंभार यांचे पुत्र व मारहाणीत गंभीर जखमी झालेले राहूल कुंभार याने केला आहे दरम्यान या गोंधळा नंतर कळंब पोलीस स्टेशन मध्ये एकमेका विरोधात तक्रारी देण्यासाठी दोन्हीही गट आमने-सामने पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे

भाजप शिवसेनेत धाराशिवमध्येही तणाव पाहायला मिळत आहेत. युती फीस्कटल्यानंतर आता शिवसेना आक्रमक पवित्र्यात आली आहे. आम्हाला अंधारात ठेवायचं आणि यूती तोडायची हे भाजपचे प्लॅनिंग होतं. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना आपण काहीही करू शकतो. आपलीच ताकद जास्त असल्याचं वाटतं. मात्र ही निवडणूक कोणाची ताकद किती आहे दाखवण्याचे आहे. शिवसेना ताकद दाखवणार असा आव्हान जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी दिले. निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांची शिवसेनेची बैठक घेत त्यांनी निवडणूक रणनीती आखली. लाडक्या बहिणी योजनेचे जनक एकनाथ शिंदे आहेत. त्यामूळे लाडक्या बहिणी आमच्या सोबत आहेत एकनाथ शिंदे यांचा मोठा चेहरा आमच्याकडे त्या जोरावर आम्ही निवडणूक जिंकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगराध्यक्ष पदाला कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय वरिष्ठ घेणार असल्यास ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com