आयएनएस विक्रांत आर्थिक घोटाळा प्रकरणातून किरीट सोमय्यांना क्लीनचिट

आयएनएस विक्रांत आर्थिक घोटाळा प्रकरणातून किरीट सोमय्यांना क्लीनचिट

आयएनएस विक्रांत आर्थिक घोटाळा प्रकरणातून किरीट सोमय्यांना क्लीनचिट मिळाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आयएनएस विक्रांत आर्थिक घोटाळा प्रकरणातून किरीट सोमय्यांना क्लीनचिट मिळाली आहे. भारतीय नौदलात महत्त्वपूर्ण कामगिरी केलेल्या आयएनएस विक्रांत युद्धानौका जीर्ण झाल्याने ती भंगारात काढण्याबाबत विचार सुरु होता. मात्र ही युद्धनौका भंगारात काढण्याऐवजी तिची डागडूजी करत संग्रहायल रुपात जतन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, त्यावेळी भाजपचे खासदार असलेले किरीट सोमय्या आणि त्यांच्या पुत्राने पुढाकार घेत मुंबईत ठिकठिकाणी लोकांकडून मदतनिधी गोळा केला होता. भाजपचे अनेक, आमदार, लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर उतरून गल्लीबोळ्यात लोकांकडे जाऊन निधी गोळा केला. यातून सुमारे 57 कोटींचा निधा गोळा झाला. मात्र या निधीचा सोमय्या पितापुत्राने अपहार केल्याचा आरोप करत माजी सैनिक बबन भोसले यांनी 7 एप्रिल 2022 रोजी ट्रॉम्बे पोलिसांत गुन्हा दाखल केला.

त्यानुसार सोमय्या पिता पुत्राविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 429, 406 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जामीनासाठी याचिका केली. मात्र या प्रकरणी सोमय्या पितापुत्रांविरोधात कोणतेही ठोस पुरावे न सापडल्याची कबुली मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टात दिली आहे. लवकरचं या प्रकरणाचा अहवाल कोर्टासमोर सादर होत सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक नील सोमय्या यांना आयएनएस विक्रांत आर्थिक घोटाळा प्रकरणातून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणातून क्लिनचीट दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com