Kirit Somaiyya | किरीट सोमय्यांना 'त्या' घोटाळ्यात क्लिनचीट | Lokshahi Marathi

किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाला INS विक्रांत घोटाळ्या प्रकरणात क्लीन चिट, 57 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप फेटाळला.
Published by :
shweta walge

कथित INS विक्रांत घोटाळ्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांना अखेर क्लीन चीट मिळालीये.आयएनएस विक्रांतच्या जीर्णोद्धाराच्या नावाखाली 57 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप होता.

भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या दोघांना क्लीन चिट मिळाली आहे. पोलिसांनी केला सी (क्लोजर) समरी रिपोर्ट किल्ला कोर्टात सादर करण्यात आलं आहे. पहिला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळल्यानंतर दुसऱ्यांदा मुंबई पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट सादर केलं आहे.सोमय्या आणि त्यांच्या मुलाने निधीचा गैरवापर केल्याचा कोणताही पुरावा सापडला नसल्याचा पोलिसांचा दावा.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com