राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत 6 महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज राज्य मंत्रीमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. त्याचप्रमाणे विविध विभागांशी संदर्भात अनेक मोठे निर्णय या बैठकीदरम्यान घेण्यात आले आहेत. या बैठकीदरम्यान अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे मात्र अनुपस्थित राहिलेले दिसून आले. यामुळे याबद्दल सोशल मीडियावर आता मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीदरम्यान कोणते निर्णय घेण्यात आले? त्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.
राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेले 6 महत्त्वाचे निर्णय
1. वित्त विभाग : सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली.
2. गृह विभाग : अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी 346 नवीन पद निर्मिती व त्यासाठीच्या खर्चास मान्यता
3. सार्वजनिक बांधकाम विभाग : राज्यातील रोपवेच्या कामासाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लिमिटेडला आवश्यक जागा उपलब्ध करुन देण्यास मान्यता
4. महसूल विभाग : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यास मंजूरी
5. जलसंपदा विभाग : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 1 हजार 594 कोटी रुपयांची मान्यता
6. जलसंपदा विभाग :जळगांव जिल्ह्यामधील चाळीसगांव तालुक्यातील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या १ हजार २७५ कोटी ७८ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता. चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील ८ हजार २९० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा.