Ice Cream : मॅग्नम आईस्क्रीमचे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर आता महाराष्ट्रात : देवेंद्र फडणवीस
आयस्क्रीम हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे. बाजारात सध्या अनेक कंपन्यांची आयस्क्रीम उपलब्ध आहेत. त्यातील एक म्हणजे द मॅग्नम आईस्क्रीम. आता या आयस्क्रीमचे उत्पादन महाराष्ट्रात होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याबद्दलची पोस्ट त्यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बीकेसी, मुंबई येथे आयोजित 'इंडिया ग्लोबल फोरम मुंबई नेक्स्ट 25' कार्यक्रम येथे महाराष्ट्र शासन आणि मॅग्नम आईस्क्रीम कंपनी होल्डको नेदरलँड्स बी.व्ही. (युनिलिव्हर)मध्ये सामंजस्य करार करण्यात आला.पुणे येथे स्थापन होणार्या युनिलिव्हरच्या सर्वात मोठ्या ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर सुरु करणार आहे. यामध्ये विकासाला गतिमान करणारी 900 कोटींची गुंतवणुक करण्यात आली आहे. कौशल्यांना बळ देणार्या 1000 पेक्षा उच्च-वेतनाच्या रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याचेही सांगितले आहे.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, द मॅग्नम आईस्क्रीम कंपनीचे ग्लोबल सीएफओ अभिजित भट्टाचार्य, मॅग्नम आईस्क्रीम कंपनी इंडिया सीईओ टोलॉय तानरीदागली आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.