Cm Devendra fadnavis : शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नजर? शिंदे गटातील 'ते' नेते स्पष्टच बोलले
महायुती सरकारमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व खात्यावर नजर ठेवणार असल्याचे समोर आले आहे. तसेच निधी वितरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम मंजूरी देणार असल्याचे समोर आले आहे. एवढच नव्हे तर एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यावर मुख्यमंत्री कार्यालयाची नजर असणार आहे.
तसेच निधी वितरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम मंजूरी देणार असल्याचेही समोर आले आहे. नगरविकास विभागाच्या उधळपट्टीला चाप लावण्यासाठी फडणवीसांनी हा निर्णय घेतला असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, ‘उधळपट्टी हा शब्द आपल्याकडून आला आहे.
फाईल वर कुठेही असे लिहिलेलं नाही. मागचा पुढचा इतिहास शोधला पाहिजे. उधळपट्टीला चाप लावण्यासाठी निर्णय घेतल्याचे कुठेही नमूद करण्यात आलेले नाही. एका ट्रॅकवर तीनही नेते महायुतीसाठी काम करतात, त्यांचे उत्तम काम सुरू आहे. तिघांच्याही नेतृत्वाखाली नगरविकास खातं चांगलं काम करत आहे.’