CM Eknath Shinde
CM Eknath Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं मुंबईच्या कोस्टल रोडचं उद्घाटन, पत्रकार परिषदेत म्हणाले; "अत्याधुनिक यंत्रणेचा..."

मुंबईतील कोस्टल रोडचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आलं.
Published by :

Eknath Shinde Press Conference : मुंबईतील कोस्टल रोडचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आलं. यावेळी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, हा फार मोठा दिलासा देणारा प्रकल्प आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचे सर्व आयुक्त आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो. एल अँड टी कंपनीच्या टीमचेही मनापासून आभार मानतो. यामध्ये अतिशय अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करुन हा टनेल बनवण्यात आला आहे.

शिंदे पुढे म्हणाले, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडचा ९ किमीचा एक टनेल खुला केला होता. हा सव्वा सहा किमीचा दुसरा फेज आहे. हा हाजीअली आणि अमरस्नपर्यंत खुला होईल. जुलैपर्यंत हा टनेल वरळीपर्यंत खुला केला जाईल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा टनेल, कोस्टल हायवे बांधण्यात आला आहे.

याआधी ४० ते ५० मिनिटांचा वेळ लागत होता. आता फक्त ८ मिनिटांत हा प्रवास होईल. रस्त्यांचा विस्तारही होतोय आणि मंत्रिमंडळाचा विस्तार पण लवकर होईल. ऑक्टोबरपर्यंत हे पूर्णपणे वरळी सी लिंकला जोडलं जाईल, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com