Eknath Shinde, Shivsena
Eknath Shinde, Shivsena

Loksabha Election: शिंंदेंच्या शिवसेनेकडून पहिली यादी जाहीर, लोकसभेसाठी ८ उमेदवार घोषित, 'या' नेत्यांना मिळाली संधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेचे ८ उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.
Published by :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेचे ८ उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, कोल्हापूर येथून संजय मंडलिक, शिर्डी येथून सदाशिव लोखंडे, बुलढाण्यातून प्रतापराव जाधव, हिंगोलीमधून हेमंत पाटील, रामटेकसाठी राजू पारवे, हातकणंगलेमधून धेर्यशिल माने, तर मावळ येथून श्रीरंग आप्पा बारणे यांना शिंदेंच्या शिवसेनेतून उमेदवारी देण्यात आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवेसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी ही पहिलीच यादी जाहीर करण्यात आलीय.

शिंदे गटाचे आठ उमेदवार

१) दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे

२) कोल्हापूर - संजय मंडलिक

३) शिर्डी - सदाशिव लोखंडे

४) बुलढाणा - प्रतापराव जाधव

५) हिंगोली - हेमंत पाटील

६) रामटेक - राजू पारवे

७) हातकणंगले - धेर्यशील माने

८) मावळ - श्रीरंग आप्पा बारणे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com