Sanjay Raut
Sanjay Raut

"मुख्यमंत्र्यांसोबत हेलिकॉप्टरमधून किमान १२ ते १३ कोटी रुपये नाशिकला आणले"; संजय राऊतांचा CM शिंदेंवर गंभीर आरोप

मोदी, शिंदे, अजित पवार, फडणवीस हे सरकारी यंत्रणेचा वापर करुन पैसे वाटतात. यासारखी गंभीर गोष्ट नाही, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी महायुतीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
Published by :

Sanjay Raut Press Conference : बारामतीत ज्या पद्धतीनं पैशाचं वाटप झालं, पैसे वाटण्यासाठी रात्री एक वाजता आणि पहाटे बँका सुरु होत्या. निवडणूक आयोगाने काही केलं नाही. निवडणूक आयोग जागेवर नाही. निवडणूक आयोगाचं लक्ष आमच्याकडे आहे. नाशिकमधला व्हिडीओ हा सर्वात मोठा पुरावा आहे. त्या हेलिकॉप्टरमधून ९ बॅगा उतरल्या. मुख्यमंत्र्यासोबत किमान १२ ते १३ कोटी रुपये हेलिकॉप्टरमधून नाशिकला आणले. त्या पैशाचं वाटप नाशिकमधून अनेक ठिकाणी झालं. पोलीस पैसे वाटपाचं काम करतात. यांनी गँग निर्माण केली आहे. मोदी, शिंदे, अजित पवार, फडणवीस हे सरकारी यंत्रणेचा वापर करुन पैसे वाटतात. यासारखी गंभीर गोष्ट नाही, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह महायुतीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

पत्रकार परिषदेत विरोधकांवर हल्लाबोल करत राऊत पुढे म्हणाले,पैसै वाटायला आणि भ्रष्टाचाऱ्यांना पाठिंबा द्यायला, ईडी, सीबीआय, आयकर विभाग आणि पोलीस महाराष्ट्रात जो पैशाचा पाऊस पडतोय, तो पाऊस कितीही पाडूद्या, नरेंद्र मोदींचा पराभव ठरलेला आहे. त्यांच्याकडे विकासाचा मुद्दाच नाही. कारण मोदी आणि शिंदेंच्या पैसे वाटपासाठी बॅगा उतरल्या नसत्या. मोदी आतापर्यंत देशावर आणि विकासावर बोलले आहेत का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बोलले आहेत का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.

आमच्या गाड्या तपासल्या जातात. मल्लिकार्जून खर्गे यांचं हेलिकॉप्टर तपासलं गेलं. मी सांगलीत गेलो, तेव्हा माझ्या हेलिकॉप्टरची तपासणी झाली. आमची झाडाझडती होते. मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, गृहमंत्री खोके उतरवतात, त्यांचा तपासणी कुणी करायचा. आपल्याला लोकांचा पाठिंबा आहे ना, मग या बॅगा का उतरवत आहेत आणि कोणासाठी या बॅगा आणल्या आहेत? निवडणूक आयोगाच्या डोळ्यावर झापड आली आहे का? राज्याच्या पोलीस महासंचालक आमचा फोन रेकॉर्ड करत होत्या, त्या कर्तव्यदक्ष आहेत, मग त्या काय गॉगल लावून बसल्या आहेत का? नरेंद्र मोदी म्हणतात ईडी फार उत्तम काम करते. ईडी ही नरेंद्र मोदींची गँग आहे. ईडी लुटारू टोळी आणि झुंड आहे. या पैशांच्या बॅगा उतरत आहेत, हे नरेंद्र मोदींना दिसत नाही, असंही राऊत म्हणाले.

नाशिकमध्ये दोन तासासाठी मुख्यमंत्री आले. जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरतात. ५०० सूट आणले का सफाऱ्या आणल्या, या बॅगा कसल्या आहेत? कोणत्या हॉटेलमध्ये या बॅगा गेल्या? तिथून कुणाला वाटप करण्यात आलं? हे सुद्धा व्हिडीओ आम्ही लवकरच देणार आहोत. जिथून हे लोक पैसे घेऊन गले आणि मुख्यमंत्र्यांनी दिले, हे पैसे कोणाला दिले? असे प्रश्न उपस्थित करून राऊतांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com