अंधेरी उड्डाणपुलावर चारचाकीला आग; भर पावसात शिंदे ताफा थांबवून खाली उतरले अन्…

अंधेरी उड्डाणपुलावर चारचाकीला आग; भर पावसात शिंदे ताफा थांबवून खाली उतरले अन्…

अंधेरी उड्डाणपुलावर चारचाकीला आग लागल्याची घटना घडल्याची माहिती मिळत आहे. मुंबई एअरपोर्टजवळ एका आलीशान फॉर्च्युनर कारने सोमवारी मध्यरात्री पेट घेतला. नेमक्या याच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा हा मुंबईच्या दिशेने जात होता.

अंधेरी उड्डाणपुलावर चारचाकीला आग लागल्याची घटना घडल्याची माहिती मिळत आहे. मुंबई एअरपोर्टजवळ एका आलीशान फॉर्च्युनर कारने सोमवारी मध्यरात्री पेट घेतला. नेमक्या याच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा हा मुंबईच्या दिशेने जात होता. ही आग पाहून मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवली आणि कारमालकासोबत बातचीत केली.

मुख्यमंत्र्यांनी त्या तरुणाची विचारपूस करत म्हणाले की, जीव वाचला ते मोठं काम... काळजी करु नकोस, आपण गाडी दुसरी घेऊ असं म्हणत त्यांनी तरुणाला धीर दिला. पेटत्या बाईकपाशी जाऊ नकोस, या तरुणाची विचारपूस करुन निघताना मुख्यमंत्री त्याच्यासोबत कोण आहे असं विचारल्यानंतर या तरुणासोबत एक व्यक्ती असल्याचं उपस्थित पोलीस शिंदेंना सांगतात. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, “तू गाडीच्या जवळ जाऊ नकोस बाळा” असं या तरुणाला सांगतात. असे ते म्हणाले. यावेळी पोलीस यंत्रणेनं कोणताही अनुचित घटना घडू नये, यासाठी वाहतूक रोखली होती. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे फॉर्च्युनर कारला आग लागल्याची शक्यता आहे.

या साऱ्या प्रकरणाचा व्हिडीओ शिंदे गटाच्या समर्थक असणाऱ्या शितल म्हात्रे यांनी ट्वीटरवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी “रात्रीचे १२.३०.. पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्ले येथे एका तरुणाच्या गाडीला अचानक आग लागली. औरंगाबादहून मुंबईला येताना विमानतळावरून घरी जाताना भर पावसात खाली उतरुन मुख्यमंत्री शिंदेंनी संबंधित यंत्रणेला त्या तरुणाला मदत करण्याचे आदेश दिले. हे आहेत आपले मुख्यमंत्री,” असे कॅप्शन दिलं आहे.

Lokshahi
www.lokshahi.com