एकनाथ शिंदेनी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना पुन्हा डावललं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई व ठाण्यातील एकूण नऊ विभागप्रमुखांच्या यादी जाहीर झाली. या यादीतून नेते व उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. मात्र या यादीत औरंगाबादेतील आमदार संजय शिरसाट यांचे नाव नाही आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या शिरसाटांच्या नाराजीत आता आणखी भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेतेपदी रामदास कदम, आनंदराव अडसूळ, भावना गवळी, प्रताप जाधव आणि गुलाबराव पाटील यांची नियुक्ती केली आहे. नरिमन पॉईंट येथील महिला विकास मंडळाच्या सभागृहात शिंदे गटाची मंगळवारी बैठक झाली.
त्यात राज्यपातळीवरील नेते व उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळेल या अपेक्षेवर असणाऱ्या संजय शिरसाट यांना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.