Eknath Shinde Speech
Eknath Shinde Lokshahi

"राज्याचं वर्तमान सुधारलं आहे, आता भविष्यही...",महायुतीच्या राज्यस्तरीय मेळाव्यात CM एकनाथ शिंदेंची तोफ धडाडली

"हे सरकार फिल्डवर उतरून काम करणारं आहे. हे सरकार लोकांचं आहे. हे सर्वसामान्याचं सरकार आहे. हे सरकार सर्वांचं आहे"
Published by :

Eknath Shinde Speech : लोकांच्या मनातलं सरकार पाहिजे होतं, महायुतीचं, बाळासाहेबांच्या विचारांचं, वैचारीक भुमिकेतील सरकार आपण स्थापन केलं. ५० लोक सोबत होते, १३ खासदार नंतर आले. त्यानंतर लाखो, हजारो शिवसैनिकही सोबत आले. मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भक्कम साथ लाभली. भाजपच्या नेत्यांनीही मला भरपूर प्रेम दिलं. बाळासाहेबांचे आणि दिघे साहेबांचे विचार सोबत होतेच. त्यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा खंबीरपणे पाठिशी उभे राहिले. आता महाराष्ट्राचं चित्र पालटलं आहे. सर्व कामं ठप्प झाली होती. सर्व ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकले होते. सण-उत्सव बंद होते. फक्त फेसबुकच चालू होतं. आपण आल्यानंतर आनंदाचं वातावरण निर्माण झालं. सर्व निर्बंध हटवले आणि सण-उत्सव जल्लोषात साजरे झाले. राज्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. राज्याचं वर्तमान सुधारलं आहे आणि आता भविष्यही उज्ज्वल करण्याचा ध्यास घेतला आहे, असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते महायुतीच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, ही वस्तूस्थिती आहे. तुम्ही सर्व इथे उपस्थित आहात, ही आमच्या सरकारची ताकद आहे. एकजुटीने महायुती मजबूत करून पुढं गेलं पाहिजे. आपल्या सरकारचा विचार, विकास आणि विश्वास ही त्रिसुत्री आहे. त्याच्यावर आपण काम करत आहोत. हे सरकार फिल्डवर उतरून काम करणारं आहे. हे सरकार लोकांचं आहे. हे सर्वसामान्याचं आहे. हे सरकार सर्वांचं आहे. गेले दोन वर्षे आपण पाहिलं, तर आमच्या कॅबिनेटमध्ये वैयक्तीक लाभाचा एकही निर्णय घेतला नाही. पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय आम्ही घेतला. शेतकरी, कष्टकरी, या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे.त्याच्या आयुष्यात बदल घडला पाहिजे.

सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही. पण राज्यातल्या सर्वसामान्य माणसाचं सोनं करण्याचं काम आम्ही करत आहोत. सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडेल, असं म्हणायचे. पण सरकार पडलं नाही. सरकारची कामगिरी पाहून विरोधकांचे चहरे पडले. आम्ही ज्या कल्याणकारी योजन जाहीर केल्या. त्यानंतर विरोधकांचे चेहरे पांढरे पडले होते. अजितदादा जेव्हा अर्थसंकल्प मांडत होते, तेव्हा विरोधक कावरेबावरे झाले होते. सरकारचे पैसे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, ही भावना आमच्या मनात आहे. पण या योजनेत खोडा घालण्याचा काम विरोधकांनी केलं, असंही शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com