Eknath Shinde
Eknath Shinde

पुणे हिट अँड रन प्रकरणात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल - CM एकनाथ शिंदे

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :

CM Eknath Shinde On Pune Hit And Run Case : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे म्हणाले,पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत. काही बार आणि पबवर पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. अनधिकृत बार, पब सुरु असतील, तर त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील. श्रीमंत असो की गरीब, कुणालाही सोडणार नाही. कायद्यासमोर सर्व समान आहेत.

पत्रकार परिषदेत शिंदे पुढे म्हणाले, जे कुणी दोषी असतील, कोणत्याही परिस्थितीत एकालाही सोडायचं नाही. मी स्वत: पोलीस आयुक्तांशी बोललोय. ज्यांचा मृत्यू झाला आहे, तेही कुणीतरी आई-वडीलांचे मुलगा आणि मुलगी आहेत. कुणाला अपघातात मारण्याचा लायसन्स दिलेला नाही. त्यामुळे जो कुणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई होईल.

पावसाळ्यापूर्वीचा आढावा घेत शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले, लोकांची जीवितहानी आणि मालमत्तेची हानी होऊ शकते. त्यामुळे आजच मी एमएमआरडीएसोबत चर्चा केली आहे. धोकादायक ठिकाणी दरडी कोसळू शकतात. तिथे राहणाऱ्या लोकांना तातडीनं स्थलांतरीत करायचं आणि एमएमआरडीएच्या घरामध्ये पर्यायी व्यवस्था करायची.

ज्या ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे, तिथे सेफ्टी नेट लावून टाकायचं. त्यामुळे ही सर्व धोकायदायक ठिकाणे सुरक्षीत राहतील. त्या ठिकाणी दगड, गोटे कोसळणार नाहीत. लोक म्हणतात, आम्हाला नोटिसा देऊन घर खाली करायला सांगतात, मग आम्ही जायचं कुठं? त्यामुळे त्यांचीदेखील आम्ही व्यवस्था केली आहे. एमएमआरडीएच्या घरांमध्ये त्यांना आम्ही निवार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, असंही शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com