Eknath Shinde
Eknath Shinde

मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवर CM एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले; "अपयशाने खचून..."

मला सरकारमधून मोकळं करावं ही नेतृत्त्वाला विनंती आहे, असं फडणवीस म्हणाले. फडणीवासांच्या विधानामुळं राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.
Published by :

Eknath Shinde On Devendra Fadnavis : लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल काल मंगळवारी झाला. महाराष्ट्रात महायुतीचा ४८ पैकी १७ जागांवर विजय मिळाल्यानं भारतीय जनता पक्षाकडून चिंतन सभा घेतल्या जात आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मोठं विधान केलं. मला सरकारमधून मोकळं करावं ही नेतृत्त्वाला विनंती आहे, असं फडणवीस म्हणाले. फडणीवासांच्या विधानामुळं राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी आहे. आम्ही तिन्ही पक्षांनी निवडणुकीत एकत्र काम केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या असल्या, तरी मी त्यांच्याशी बोलेन. अपयशाने खचून जाणारे आम्ही नाहीत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

माध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले, निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी आहे. आम्ही तिन्ही पक्षांनी निवडणुकीत एकत्र काम केले होते. मतांची टक्केवारी पाहिली, तर मुंबईत महायुतीला दोन लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. संविधान बदलणार हे नॅरेटिव्ह म्हणजे विरोधकांनी खोट बोला पण रेटून बोला या उद्देशाने तात्पुरते नॅरेटिव्ह सेट केले. मोदी हटाव असा नारा विरोधक करत होते. मात्र, मतदारांनी या विरोधकांना तडीपार केलं आहे. मोदींकडे विकासाचा अजेंडा आहे. पराभवाची कारणमिमांसा केली जाईल. गेल्या दोन वर्षात राज्यात अनेक चांगले निर्णय सरकारने घेतले.

या निवडणुकीत जागा कमी झाल्या असल्या तरी मते वाढली आहेत. देवेंद्र फडणवीसांनी भावना व्यक्त केल्या असतील तरी मी त्यांच्याशी बोलेन. अपयशाने खचून जाणारे आम्ही लोक नाही. जनतेची दिशाभूल करुन मते मिळवण्याचा प्रयत्न केला हे तात्पुरते यश आहे. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे आहोत. विरोधकांच्या अपप्रचारामुळे जनतेचा संभ्रम दूर कमी करण्यात आम्ही कमी पडलो. मुंबईत महायुतीला दोन लाख अधिक मते मिळाली. मूळ मतदार महायुतीबरोबर असल्याचे दिसून आले, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com