CM Eknath Shinde
CM Eknath Shinde

"बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली द्याल, तर..."CM एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा

हिंगोली मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.
Published by :
Naresh Shende
Published on

लोकसभा निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेनं काल बुधवारी हेमंत पाटील यांची हिंगोलीची उमेदवारी रद्द केली. त्यांच्या जागेवर बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, शिवसैनिक जर कामाने मोठा झाला आणि तो मुख्यमंत्री म्हणून इथे आला, तर सर्वात जास्त मला आनंद होईल. हा बाळासाहेबांचा विचार आहे. पण बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली द्यायला लागले, तर एकनाथ शिंदे हे सहन करणार नाही. शिंदे हिंगोली मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते.

शिंदे पुढे म्हणाले, खासदार हेमंत पाटील यांना मी म्हणालो, यावेळी आपण थोडा बदल करुया. राजश्री ताईंना बाजूच्या मतदारसंघात आपण निवडून आणुया. माहेरचा ओढा असल्यानं त्यांच्या लोकांनी कामाला सुरुवात केलीय. चांगला कार्यकर्ता असेल तर त्याला पुढे आणायचं. माझा मुलगा श्रीकांत शिंदेंनी मला सांगितलं की, आपली शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आहे. बाळासाहेबांच्या आणि पंतप्रधान मोदींच्या विचाराने या राज्याचा सर्वांगीण विकास करणारी ही शिवसेना आहे. या शिवसेनेत कुणीही नोकर किंवा मालक नाही. आपण सर्व एक आहोत. आपल्या पक्षात राजाचा मुलगा राजा बनणार नाही. जो काम करेल तो राजा बनेल.

मुख्यमंत्री झाल्यावर अनेकांना पोटदुखी झाली. त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाही सुरु केला. शिवसैनिक जर कामाने मोठा झाला आणि तो मुख्यमंत्री म्हणून इथे आला, तर सर्वात जास्त मला आनंद होईल. हा बाळासाहेबांचा विचार आहे. पण बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली द्यायला लागले, तर एकनाथ शिंदे हे सहन करणार नाही. खासदार हेमंत पाटील यांना मी म्हणालो, यावेळी आपण थोडा बदल करुया. राजश्री ताईंना बाजूच्या मतदारसंघात आपण निवडून आणुया. माहेरचा ओढा असल्यानं त्यांच्या लोकांनी कर्तव्य बजावण्यास सुरुवात केलीय. मी हेमंत पाटील यांना सांगितलं, तुमच्या पाठिशी एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे. शब्द देऊन पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com