फडणवीसांकडे नागपुरची तर चंद्रकांत पाटलांकडे पुण्याची जबाबदारी; पाहा पालकमंत्र्यांची यादी

फडणवीसांकडे नागपुरची तर चंद्रकांत पाटलांकडे पुण्याची जबाबदारी; पाहा पालकमंत्र्यांची यादी

स्वातंत्र्या दिनाच्या दिवशी आता हे सर्व पालकमंत्री तिरंगा फडकावताना दिसणार आहेत.
Published by :
Sudhir Kakde
Published on

एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल पडला. तब्बल सव्वा महिन्यांनी मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं आहे. भाजप आणि शिंदे गटातील 18 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा मंगळवारी पार पडला. त्यानंतर आता बहुतांश जिल्ह्यांसाठी पालकमंत्री देखील निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे आता राज्यातील अनेक जिल्ह्यांचे प्रश्न मार्गी लागणार असल्याची शक्यता आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. शेतीचं आणि इतर मालमत्तांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मात्र राज्याला पालकमंत्री नसल्यानं लोकांना मदत कोणाकडे मागावी हे कळत नव्हतं.

कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी कोणकडे?

  1. देेवेंद्र फडणवीस- नागपूर

  2. सुधीर मुनगंटिवार-चंद्रपूर

  3. चंद्रकांत पाटील - पुणे

  4. राधाकृष्ण विखे पाटील - अहमदनगर

  5. गिरीश महाजन - नाशिक

  6. दादा भुसे - धुळे

  7. गुलाबराव पाटील - जळगाव

  8. रवींद्र चव्हाण - ठाणे

  9. मंगलप्रभात लोढा - मुंबई उपनगर

  10. दीपक केसरकर - सिंधुदुर्ग

  11. उदय सामंत - रत्नागिरी

  12. अतुल सावे - परभणी

  13. संदिपान भुमरे - औरंगाबाद

  14. सुरेश खाडे - सांगली

  15. विजयकुमार गावित - नंदुरबार

  16. तानाजी सावंत - उस्मानाबाद

  17. शंभूराज देसाई - सातारा

  18. अब्दुल सत्तार - जालना

  19. संजय राठोड - यवतमाळ

अमरावती येथे विभागीय आयुक्त

कोल्हापूर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, सोलापूर, लातूर, वाशिम, बुलडाणा, पालघर, नांदेड या ठिकाणी संबंधित जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com