CM Eknath Shinde in SataraTeam Lokshahi
ताज्या बातम्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वत: केली शेतीची मशागत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अनोख रुप पाहायला मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावी दोन दिवसांसाठी मुक्कामी गेले आहेत.
प्रशांत जगताप : सातारा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अनोख रुप पाहायला मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावी दोन दिवसांसाठी मुक्कामी गेले आहेत. यावेळी त्यांनी स्वत: शेतीची मशागत केली आहे.
गेल्या साडेतीन महिन्यांपूर्वी सत्तापालट झालं आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागली. राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदे कामात प्रचंड व्यस्त असल्याचं चित्र आहे.
आपण शेतात स्वत: काम केलं पाहिजे. तेव्हा आपण दुसऱ्याला सांगू शकतो. नवं तंत्रज्ञान वापरायला हवं. आपण इथे ते वापरलं आहे. ठिबक सिंचनने एकाच वेळी सगळ्याच झाडांना पाणी मिळतं, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.