Eknath Shinde
Eknath Shinde

"इंडिया आघाडीच्या नादाला लागून उबाठाने पाकिस्तानची हुजरेगिरी केली"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

"पराभवाच्या भितीमुळं इंडिया आघाडी पूर्णपणे बिथरली आहे. त्यांच्या नादाला लागून उबाठाने पाकिस्तानची हुजरेगिरी केली आहे"
Published by :

Eknath Shinde On Uddhav Thackeray : पराभवाच्या भितीमुळं इंडिया आघाडी पूर्णपणे बिथरली आहे. त्यांच्या नादाला लागून उबाठाने पाकिस्तानची हुजरेगिरी केली आहे. मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसाला निवडणुकीत प्रचारात उतरवलं आहे. त्यांच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फिरू लागले आहेत. हे दुर्देवं आहे. माझं मत काँग्रेसला देणार म्हणून अभिमानाने सांगतात. बाळासाहेबांच्या मनाला किती वेदना होत असतील. त्यांना किती यातना वाटत असतील. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला तरी चालेल, काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होऊ देणार नाही आणि पाकिस्तानमध्ये अमुबॉम्ब होऊ देणार नाही, असं सांगणारे फारुक अब्दुल्ला त्यांना चालतात. पण हे जनतेला चालणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली. ते कल्याणमध्ये कपिल पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

शिंदे पुढे म्हणाले, मोदींच्या आशीर्वादाने कपिल पाटील आणि श्रीकांत शिंदे विजयाची हॅट्ट्रीक करतील, असा मला विश्वास आहे. ही निवडणूक कपिल पाटील किंवा श्रीकांत शिंदे यांची निवडणूक नाही. ही निवडणूक देशाचं भवितव्य घडवणारी आहे. ही निवडणूक राष्ट्राचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. ही निवडणूक देशाचा विकास घडवणारी निवडणूक आहे. पुन्हा एकदा मोदी सरकार आणणारी ही निवडणूक आहे. देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी ही निवडणूक आहे. कपिल पाटील यांना मत म्हणजे मोदींना मत. डॉ.श्रीकांत शिंदेंना मत म्हणजे मोदींना मत. देशात सर्वत्र मोदींचा गजर ऐकू येत आहेत. पण भरकटलेले विरोधीपक्ष मोदींच्या नावाने शिव्याशाप देतात. पण लोक बघत आहेत.

एकटे मोदी किती लोकांना भारी पडत आहे, हे देश पाहत आहे. प्राण जाये, पर वचन न जाये, ही मोदींची ओळख आहे. ते जे बोलतात ते करून दाखवतात. त्यांनी ३७० कलम हटवलं. ते म्हणाले या देशात राम मंदिर बांधणार. जे बोलतात ते करुन दाखवतात, त्याला मोदी म्हणतात. देशाला महासत्ता करण्याचं स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणार. हा विश्वास आणि मोदी गॅरंटी आहे. विरोधकांच्या प्रत्येक भाषणात मोदींवर टीका-टीप्पणी असते. मोदीजी प्रत्येक सभेत भारताच्या उज्ज्व भविष्याचं व्हिजन सांगतात. देश पुढे कसा न्यायचा आहे, देशाची प्रगती कशी करायची आहे, सेवा समर्पण आणि गरिब कल्याणासाठी मोदी काम करत आहेत.

भारताला विकासाची नवी दिशा देणारे आणि दहशवाद्यांच्या मुसक्या बांधणारे नरेंद्र मोदी आहेत. भ्रष्टाराचा खात्मा करणारे नरेंद्र मोदी आहेत. देशाला महासत्ता करणारे नरेंद्र मोदी आहेत. देशातील १४० कोटी जनतेला मोदी आपलं कुटुंब मानणारे आहेत. सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला धडा शिकवणारे नरेंद्र मोदी आहेत. म्हणून १४० कोटी जनतेनं त्यांना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याची गॅरंटी घेतली आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.

मोदींचा अर्ज भरण्यासाठी आम्ही वाराणसीला गेलो होतो. मोदींचा अर्ज भरून देण्याची संधी आम्हाल मिळाली, हे आमचं भाग्य आहे. मोदी जनतेच्या हृदयातील पंतप्रधान आहेत. मोदींसारखा प्रधानमंत्री यापुढे होऊ शकत नाही. मी आजपर्यंत मोदींच्या चेहऱ्यावर कधीच निराशा पाहिली नाही. २०१४ पूर्वी देशाचा प्रधानमंत्री कल्याणमध्ये आला नव्हता. पण २०१४ नंतर मोदी तीनवेळा कल्याणमध्ये आले. हे आपलं भाग्य आहे. मोदींचं पाऊल इथे पडलं आहे. भिवंडी, कल्याण आणि ठाणेही आपण जिंकलेलं आहे, असा माहोल या ठिकाणी तयार झालं आहे, असंही शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com