एकनाथ शिंदेंनी रात्री उशिरा घेतली अमित शाहांची भेट

एकनाथ शिंदेंनी रात्री उशिरा घेतली अमित शाहांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमुळे सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमुळे सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे. शिंदे आणि शाह यांच्यामध्ये ४० मिनिटं चर्चा सुरु होती. शिवसेनेचे १३ राज्यांतील प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात सामील झाल्याच्या निमित्त बुधवारी महाराष्ट्र सदनामध्ये जंगी कार्यक्रम घेण्यात आला.

त्यांच्या या भेटीत न्यायालयातील सुनावणी, दसरा मेळावा या विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्रीय वाहतूक व रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचीही एकनाथ शिंदे भेट घेणार असल्याची चर्चा होती. पण, या केंद्रीय मंत्र्यांपैकी एकाचीही त्यांची भेट होऊ शकली नाही.

एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत अमित शाह यांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतल्याचं म्हटलं आहे.

Lokshahi
www.lokshahi.com