eknath shinde
eknath shindeTeam Lokshahi

राज्यभरातूनच नव्हे तर राज्याच्या बाहेरूनही लोक येण्यास उत्सुक; दसरा मेळावा जोरात होणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बीकेसी येथे होणारे दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून नव्हे तर राज्याच्या बाहेरून देखील लोक येण्यास उत्सुक आहेत उद्या मोठ्या प्रमाणात लोक दसरा मेळाव्याला येतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवला. त्यांनी आज कल्याण मधील दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गाडी देवीची दर्शन घेतलं. त्याआधी त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या डोंबिवलीतील रास रंग नवरात्र उत्सवाला देखील हजेरी लावली होती
Published by :
Siddhi Naringrekar

अमजद खान, कल्याण

बीकेसी येथे होणारे दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून नव्हे तर राज्याच्या बाहेरून देखील लोक येण्यास उत्सुक आहेत उद्या मोठ्या प्रमाणात लोक दसरा मेळाव्याला येतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवला. आज कल्याण मधील दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गाडी देवीची दर्शन घेतलं .त्याआधी त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या डोंबिवलीतील रास रंग नवरात्र उत्सवाला देखील हजेरी लावली होती.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नवरात्र उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात तुमचं सर्व सामान्य लोकांचं सरकार आलं आहे आम्ही पण तीन महिन्या पूर्वी मोठा कार्यक्रम केला तो कार्यक्रम मोठा झाला आता सगळे कार्यक्रम मोठे होतील असा टोला ठाकरे यांना लगावला. दिवाळी चांगली पाहिजे म्हणून सरकारने रवा ,साखर , डाळ ,तेल फक्त १०० रुपयात केलं ,सरकारला अजून १०० दिवस झाले नाही पण आम्ही सगळ १०० रुपयात केलं ,हे छोटं काम आहे मोठ मोठी कामे करायची आहेत असे सांगितले

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण मधील दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीचे दर्शन घेतलं. ग्रामस्थांनी ढोल ताशाच्या गजरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी नवरात्र उत्सव सगळीकडे श्रद्धापूर्वक मोठ्या उत्साहात साजरा झाला याचा आनंद होतोय. पुढे बीकेसी येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याबाबत बोलताना बीकेसी येथे होणारा दसरा मेळावा जोरात होणार ,राज्यभरातून नव्हे तर राज्याच्या बाहेरून देखील लोक येण्यासाठी उत्सुक आहेत.

eknath shinde
आज दसरा मेळाव्याचा आखाडा; ठाकरे - शिंदे लढाईचा शंखनाद
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com