CM Eknath Shinde
CM Eknath ShindeTeam Lokshahi

Shivrajyabhishek Din 2023 : न भूतो न भविष्यति असा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार : मुख्यमंत्री शिंदे

छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तिथीनुसार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर पार पडत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तिथीनुसार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत.

ढोल ताशाच्या गजरात शिवभक्तांनी राजांना मानाचा मुजरा केला आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांनी गर्दी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची राजेशाही मिरवणूक निघणार आहे. आज सकाळी 7 ते 12 या वेळेत किल्ले रायगडावर राज्याभिषेकाचा मुख्य सोहळा संपन्न होत आहे.  हा सोहळा 6 जूनपर्यंत साजरा करण्यात येणार आहे. 

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा न भूतो न भविष्यति असा भव्यदिव्य साजरा होईल. त्याची सर्व तयारी सर्व नियोजन केलेलं आहे. वर्षभर आपला हा कार्यक्रम सुरु राहणार आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com