मी बोललो तर अनेकांची अडचण होईल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मी बोललो तर अनेकांची अडचण होईल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट शिवसेना नक्की कोणाची यावरून दावे- प्रतिदावे सुरु होते.

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट शिवसेना नक्की कोणाची यावरून दावे- प्रतिदावे सुरु होते. त्यातच सुप्रिम कोर्टात सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु असतानाकेंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आणि शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले. यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या.

यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्हाला कुणाचीही संपत्ती नको. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. मी दिलेल्या गोष्टी कधी काढत नाही आणि त्यावर बोलणार नाही. मला बोलायला लावू नका. मी बोललो तर अनेकांची अडचण होईल. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com