उद्धव ठाकरेंच्या वज्रमुठ सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

उद्धव ठाकरेंच्या वज्रमुठ सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

वज्रमुठ सभेतून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

वज्रमुठ सभेतून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईतील बीकेसी मैदानावर ही सभा पार पडली. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, काही लोक म्हणतात मुंबई तोडणार, मुंबई तोडणार. कोण मुंबई तोडणार आहे? कुणीच मुंबई तोडण्याची हिंमत करू शकत नाही. ही हिंमत करताही येणार नाही. महाराष्ट्रातील जनतेला आरोप-प्रत्यारोप, खालच्या दर्जाची भाषा आवडत नाही. त्यामुळे ही पोटदुखी सुरू झाली आहे. ही पोटदुखी वाढणार आहे म्हणून आम्ही बाळासाहेब ठाकरे दवाखानाही तयार करून ठेवला आहे. त्यांनी तिकडे जाऊन मोफत औषध घ्यावं. असे शिंदे म्हणाले.

यासोबतच ते म्हणाले की, शेवटी आमदार असो की मुख्यमंत्री, कुणाला बसवायचं आणि कुणाला उतरवायचं हे सर्व जनता जनार्दनाच्या हातात असतं. खरी एकजूट आणि विकासाची वज्रमुठ इथं पाहायला मिळत आहे. असे शिंदे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com