Eknath Shinde: 'गरीबी हटाव' घोषणा झाल्या, पण मोदींनींच गरीबी हटवण्याचा प्रयत्न केला'

Eknath Shinde: 'गरीबी हटाव' घोषणा झाल्या, पण मोदींनींच गरीबी हटवण्याचा प्रयत्न केला'

देशभरात आज ७७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनेतला संबोधित केले.
Published by  :
shweta walge

देशभरात आज ७७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनेतला संबोधित केले. भाषणामध्ये त्यांनी वर्षभरात राज्य सरकारच्या वतीने केलेल्या कामांचा उल्लेख केला आहे. पूर्वीच्या सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका देखील केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, यापूर्वीही काही लोकांनी देशातली गरीबी हटावचा नारा दिला मात्र ही घोषणाच राहिली. पण गेल्या पाच वर्षात खऱ्या अर्थाने पंतप्रधानांनी गरिबी हटवण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षभरात सरकारने अनेक निर्णय घेतलेले आहेत. मी सर्व निर्णय सर्वसामान्यांच्या हित लक्षात घेतलेले आहेत, शासन आपल्या दारी महत्त्वाचा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न थेट सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.

पुढे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी आपण पिक विमा सुरू केली. राज्यात अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. रखडलेल्या जलसंपदा योजनांना आपण चालना दिली आहे. त्यामुळे जवळपास आठ लाख क्षेत्रफळाचे जमीन पाण्याखाली येणार आहे. आपण आपल्या सरकारने ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा प्रवास मोफत केलेला आहे, त्याचबरोबर महिलांना देखील केलेला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 10व्यां दा लाल किल्ल्यावरुन ध्वाजारोहण केलं. यावेळी त्यांनी लाल किल्ल्यावरुन महिला शक्तीचा जागर करत अनेक नवीन योजनांची घोषणा केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com