Eknath Shinde
Eknath Shinde

"विनापरवाना तसेच मोठ्या आकाराच्या होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाई करा"; CM शिंदेंनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

पावसाळापूर्वीच्या नालेसफाईच्या कामांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.
Published by :

Eknath Shinde Press Conference : कोणत्याही प्रकारे जीवितहानी होऊ नये, तसेच लोकांच्या मालमत्तेची हानी होऊ नये यासाठी संपूर्णपणे नालेसफाई झाली पाहिजे. नाल्यातील संपूर्ण गाळ काढून तो काठावर न ठेवताच त्याची व्हिल्हेवाट लावणे. याबाबतीतही सूचना दिलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी पाणी तुंबतं, त्याठिकाणी हाय प्रेशरचे पंप २४ तास ठेवणे, १२-१३ ठिकाणी होल्डिंग पाँड ठेवले आहेत. जेणेकरून त्या ठिकाणी पाणी साचवता येईल. पावसाची पाणी साचतं, ते स्टोरेज करण्याच्या सिस्टिमची व्यवस्था करणे. नाल्यांचे तोंड रुंद करणे. होर्डिंगच्या संदर्भातही चर्चा झाली. विनापरवाना होर्डिंगवर तसेच मोठ्या आकाराच्या होर्डिंगवर कारवाई करण्यासाठी पुन्हा सूचना दिल्या, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले.

शिंदे पुढे म्हणाले, अनधिकृत होर्डिंग कापणे आणि अशा होर्डिंग लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे, याबाबतही चर्चा झाली. झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, याबाबतही सूचना दिल्या आहेत. रेल्वे आणि विमानतळ हद्दीतील नाले, तसच एमएमआरडीए हद्दीतील पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करण्यासाठी सांगितलं आहे. पाणी तुंबल्यामुळे रेल्वे बंद पडल्यास बेस्टची सूविधा देण्यात येईल. दरडग्रस्त ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षीत स्थळी कसं पाठवता येईल, याबाबत बीएमसीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत.

दरडग्रस्तांना राहण्याची व्यवस्था करण्यासाठी बीएमसी, म्हाडा आणि एमएमआरडीएला सूचना दिल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेची यंत्रण पूर्णपणे सज्ज ठेवली आहे. या सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून काम केलं, तर कोणतीही जीवितहानी, अपघाताच्या घटना घडणार नाहीत. नालेसफाई अजूनही सुरु आहे. हार्ड बेस लागेपर्यंत गाळ काढणे आवश्यक आहे. शासकीय यंत्रणांच्या बेजबाबदारपणामुळे पाणी साचलं तर कारवाई होणार, असा ईशाराही शिंदेंनी दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com