Maharashtra Politics, Eknath shinde, Uddhav Thackeray, Supreme Court
Maharashtra Politics, Eknath shinde, Uddhav Thackeray, Supreme CourtTeam Lokshahi

Shinde Vs Thackeray : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण मात्र सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण मात्र निकाल राखून ठेवला

सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झालेला आहे. या प्रकरणावरील निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे. 7 जणांच्या घटनापीठाकडे निर्णय जाणार का? याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का? याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला आहे. 

पुढील तारीख मात्र कोर्टानं राखून ठेवली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात तीन दिवस चाललेला  दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपला आहे. कोर्टात शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद झाला त्यानंतर ठाकरे गटाकडूनही प्रतिउत्तर देण्यात आले. हा निकाल केव्हा समोर येतो हे पाहण आता महत्वाचे आहे. सलग तीन दिवस युक्तीवाद झाले मात्र निर्णय राखून ठेवला आहे. 7 न्यायमूर्तींकडे हे प्रकरण जावे अशी याचिका ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे.

त्यामुळे आता शिवसेनेच्या ठाकरे गटाची मागणीवर 5 न्यायाधीशांच खंडपीठ सुनावणी करणार की हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com