'जे योजनेला खोडा घालतील त्यांना जोडा दाखवा' मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर थेट निशाणा
लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी सरकार राज्यभर महायुतीमधील पक्ष विशेष कार्यक्रम घेत आहेत. यातच आज नागपूरमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत 'आम्ही जे बोलतो ते करतो. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोध किती काही म्हटलं तरी तुमचं सरकार ही योजना बंद होऊ देणार नाही. बंद होणार नाही, नाही नाही नाही…’असं ते थेट म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, तुम्ही सरकारला ताकद दिली तर आम्ही ही रक्कम वाढवत नेऊ. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. आम्ही हात आखडणार नाही. आम्हाला या बहिणींना लखपती झालेलं पाहायचं आहे. मोदींनीही लखपती दीदी योजना सुरू केली. तीन कोटीतील 50 लाखापेंक्षा लाभार्थी महाराष्ट्रातील झाल्याशिवाय राहणार नाही, अस ते म्हणाले.
विरोधकांवर टीका करत म्हणाले की, जे योजनेला खोडा घालतील त्यांना जोडा दाखवा. का तुम्ही आमच्या योजनेला विरोध करत आहात. का तुम्ही आमच्या योजनेविरोधात कोर्टात जात आहेत. याचा जाब विचारा.
'आम्ही जे बोलतो ते करतो. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोध किती काही म्हटलं तरी तुमचं सरकार ही योजना बंद होऊ देणार नाही. बंद होणार नाही, नाही नाही नाही…’
पुढे ते म्हणाले की, आम्ही आता सुरक्षित बहीण देणार. कुणी बहिणींवर अत्याचार केला तर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. हे सरकार कोर्टात मागणी करणार. चुकीला माफी देणार नाही. गुन्हेगाराला माफी देणार नाही. आम्ही तुमच्या सुरक्षेची जबाबदारी घेऊ. तुमच्या हिताचा निर्णय घेऊ, असही ते म्हणाले.
ही योजना फक्त रक्षाबंधनासाठी नाही. ही योजना फक्त भाऊबीजेसाठी नाही. ती कायम राहणार आहे. एवढं लक्षात ठेवा. एकीकडे विकास सुरू आहे. दुसरीकडे कल्याणकारी योजना करत आहोत. आपण दोन वर्षात जे काम केलं, ते लक्षात ठेवा. महायुतीच्या पाठी आशीर्वाद ठेवा असं ते म्हणाले.