Cold wave : राज्यात पुढील काही दिवसांमध्ये थंडी वाढणार, हवामान विभागाचा इशारा...
राज्यात पुढील काही दिवसांमध्ये थंडी वाढणार आहे. या थंड वातावरणात महाबळेश्वरकडे जाणाऱ्या पर्यटकांचा वेग वाढला. सकाळी सर्वत्र धुके पडत आहे. राज्यात जरी थंडीची लाट असली तरीही इतर राज्यात अजूनही पावसाचे ढग अजून जोरदार पाऊस सुरू आहे. केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. देशातून मॉन्सून जाऊन बरेच दिवस झालेले असताना देखील पावसाचे ढग कामय असल्याचे चित्र आहे. उत्तरेकडील थंडी सातत्याने वाढत आहे. राज्यातही उत्तरेकडे थंडी वाढत असल्याने गारठा वाढला आहे.
नुकताच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. परभणी शहरासह जिल्हाभराचे तापमानात गेल्या तीन दिवसापासून मोठी घट नोंद केली जात आहे. गेल्या तीन दिवसापासून तापमान 6 अंशाखाली असल्याने परभणीकरांना भीषण थंडीचा सामना करावा लागतोय. हवामान विभागाने पुढचे काही दिवस तापमानात घट होत राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे.
राज्यात दोन दिवस कडाक्याच्या थंडीची लाट कायम राहणार आहे भारतीय हवामान विभागाने, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट जारी केला आहे. हेच नाही तर पुढील काही दिवसांमध्ये थंडीमध्ये मोठी वाढ होईल, असेही सांगण्यात आलंय. बऱ्याच जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने निर्णय घेत सकाळीच्या शाळेंच्या वेळात बदल केला असून वेळा पुढे ढकलल्या आहेत.
पंजाबच्या आदमपूर येथे नीचांकी 3 अंश तापमानाची नोंद झाली. निफाड 6.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. जळगाव आणि आहिल्यानगर, नाशिक, पुणे, यवतमाळ, गोदिंया, पुणे येथे 9 अंशांपेक्षाही कमी तापमानाची नोंद झाली. किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली गेला. पुढील काही दिवसांमध्ये थंडीचा कडाका वाढणार असल्याने नागरिकांनी काळजी घेणे महत्वाचे आहे. सततच्या वातावरणातील बदलामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.
