शिक्षकाचे 9 वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार, आई-वडिलांही जीवे मारण्याची धमकी
अहिल्यानगर येथून शिक्षकी पेक्षाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने त्याच्याच शाळेत शिकत असलेल्या नऊ वर्षांच्या विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले आहेत. अहिल्यानगर येथील केडगावमध्ये हा सगळा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. दरम्यान सदर व्यक्तीवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा व्यक्ती सध्या फरार असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष देवरे या आरोपीने त्याचच शाळेतील नऊ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले आहेत. सदर मुलगा व प्राचार्य एकाच इमारतीमध्ये राहतात. प्रचार्याने मुलाला शाळा सुटल्यानंतर स्वतःच्या घरी बोलावले आणि त्याच्याबरोबर अश्लील चाळे केले. तसेच त्याने विद्यार्थ्याला जीवे मारण्याची धमकी देत अनेकदा अनैसर्गिक अत्याचार केले". याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून लवकरच आरोपीला पकडण्यात येईल असेही पोलिसांनी सांगितले आहे.