Kunal Kamra Case : कॉमेडियन कुणाल कामराला पोलिसांकडून दुसरं समन्स, 1 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश

कॉमेडियन कुणाल कामराला पोलिसांकडून दुसरं समन्स, शिवसेना कार्यकर्त्यांच्या संतापामुळे हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड, 1 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश.
Published by :
Team Lokshahi

स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा अडचणीत आला आहे. त्याने त्याच्या एका शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात म्हटले होते, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. तो व्हिडिओ समोर आल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्ये आक्रमक झाले.

कुणाल कामरावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला चौकशीसाठी नोटीस बजावली होती. परंतु तेव्हा कुणाल कामरा गैरहजर राहिला त्यानंतर आता पुन्हा एकदा कुणालला दुसरा समन्स देण्यात आला आहे. त्याला १ एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com