सामान्यांना दिलासा मिळणार, खाद्यतेल स्वस्त होणार?
Janomat1

सामान्यांना दिलासा मिळणार, खाद्यतेल स्वस्त होणार?

दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. देशात खाद्य तेलाच्या किमतीत मोठी घट होणार असल्याची माहिती मिळत आहे. भारतात ऑगस्ट महिन्यामध्ये पामतेलाच्या आयातील 87 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. देशात खाद्य तेलाच्या किमतीत मोठी घट होणार असल्याची माहिती मिळत आहे. भारतात ऑगस्ट महिन्यामध्ये पामतेलाच्या आयातील 87 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर सप्टेंबर महिन्यात 10 लाख टन तेल आयात होण्याची शक्यता आहे.जुलै महिन्याच्या तुलनेत देशानं ऑगस्ट महिन्यात तब्बल ८७ टक्के अधिक तेल आयात केलं आहे. गेल्या ११ महिन्यातील ही सर्वाधिक आयात ठरली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पामतेलाच्या किमतीत ४० टक्क्यांची घट झाली आहे. याचाच फायदा घेत भारतानं मोठ्या प्रमाणात तेलाची आयात केली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाच्या किंमती 40 टक्क्यांनी घसरल्या आहेत. पामतेलाची किंमत 1800-1900 डॉलर मेट्रिक टनवरून घसरून 1000-1100 डॉलर मेट्रिक टन वर पोहोचली आहे. ऑगस्ट महिन्यात देशात 9,94,997 टन पामतेल आयात करण्यात आलं. त्याच्या तुलनेनं जुलै महिन्यात 5,30,420 टन पामतेल आयात करण्यात आलं होतं. हे प्रमाण 87 टक्क्यांनी वाढलं. तर सप्टेंबर महिन्यात देशात 10 लाख टन तेल आयात केलं जाऊ शकतं.

पामतेल स्वस्त किमतीला उपलब्ध असल्याने तेल कंपन्यांनी अधिक पामतेल आयात केलं आहे. भारतात सणासुदीचा काळ आहे. काही दिवसांवर दिवाळी आहे. अशा परिस्थितीत पामतेलाची मागणी वाढू शकते. त्यामुळे पामतेलाची आयात वाढली असून आगामी काळात खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com