साईबाबांविरोधात वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी धीरेंद्र शास्त्रींविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल
Admin

साईबाबांविरोधात वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी धीरेंद्र शास्त्रींविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात असलेले बागेश्वर धाम धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी पुन्हा एकदा साईबाबांविरोधात मोठं वक्तव्य केलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात असलेले बागेश्वर धाम धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी पुन्हा एकदा साईबाबांविरोधात मोठं वक्तव्य केलं आहे. जबलपूर येथील पानगर येथे शनिवारी आयोजित श्रीमद भागवत कथेच्या शेवटच्या दिवशी धीरेंद्र शास्त्री लोकांशी संवाद साधत होते. यादरम्यान त्यांना साईपूजेबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी साईबाबांना देव मानण्यास नकार दिला. जर कोणी सिंहाची कातडी घातली तर तो सिंह होत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, साईबाबा संत किंवा फकीर असू शकतात, परंतु देव नाही. सनातन धर्म हा शंकराचार्यांच्या तत्त्वांवर चालतो आणि ते हिंदू धर्माचे पंतप्रधान आहेत. त्यांनी साईबाबांना कधीच देवतेचा दर्जा दिला नाही. म्हणूनच ते साईबाबांनाही देव मानत नाही. साईबाबा तुलसीदासांपेक्षा श्रेष्ठ असू शकत नाहीत. पण तुलसीदास किंवा सूरदास यांनाही युगपुरुष म्हटले आहे. तसेच इतर धर्मातही युगपुरुष असू शकतात. त्याला देव कसे म्हणता येईल किंवा मानता येईल. जर ते छत्री घेऊन बसले तर त्यांना शंकराचार्य मानले जाईल का? असे ते म्हणाले.

याच प्रकरणी आता बागेश्वर बाबा यांनी शिर्डीच्या साईबाबांविरोधात केलेलं वादग्रस्त वक्तव्य समोर आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युवासेनेनं मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. शिर्डी साई संस्थानचे माजी विश्वस्त राहुल कानल यांनी तक्रारीत धीरेंद्र शास्त्री यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. तसेच, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com