संजय राऊत यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

संजय राऊत यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

संजय राऊत यांची विरोधात छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

संजय राऊत यांची विरोधात छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. संजय राऊत यांनी केलेल्या विधानानंतर भाजप प्रवक्ते प्रमोद राठोड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला संजय राऊत यांच्याकडून धोका असल्याचे भाजप प्रवक्त्याच्या तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.

भाजप प्रवक्ते यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत संजय राऊत यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. भाजप प्रवक्ते प्रमोद राठोड यांनी संजय राऊत यांना अटक करावी अशी मागणी पोलिसांत केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com