उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल; काय आहे कारण?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल; काय आहे कारण?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल

मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाचा संदर्भ देऊन रवींद्र धंगेकर आरोप केला आहे. निवडणूक प्रचाराच्या वेळी धर्माचा वापर करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला. असे धंगेकर यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान कसबा पेठ मतदार संघ हिंदुत्ववादी आहे. त्याच वेळी पुण्येश्वर मंदिराचाही उल्लेख केला होता. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने पुण्येश्वर मंदिराच्या बाबत भूमिका स्पष्ट करावी असे म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर यांनी तक्रार केली आहे.

निवडणूक प्रचाराच्या वेळी फडणवीस यांनी निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी रवींद्र धंगेकर यांनी मागणी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com