मुंबईतील कुर्ला बेस्ट बस घटनेबाबत मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल

मुंबईतील कुर्ला बेस्ट बस घटनेबाबत मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल

मुंबईतील कुर्ला परिसरात बेस्ट बस अपघातात ७ जणांचा मृत्यू, ४९ जखमी. मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीमुळे अपघाताची शक्यता.
Published by :
shweta walge
Published on

मुंबईतील कुर्ला परिसरात बेस्ट बसने घडलेल्या अमानुष घटनेबाबत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

कुर्ला येथे घडलेल्या अलौकिक घटनेत निष्पाप लहान मुले, महिला व इतर लोकांचा अमानुषपणे मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या अपघाताचे प्रमुख कारण बेस्ट बसचे बेफिकीर वरिष्ठ अधिकारी असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. ज्यामध्ये बेस्ट बसचालकावर अवाजवी दबाव टाकून अमानुष पद्धतीने (कायदा आणि मानवी हक्कांनुसार ठरलेल्या मोजमाप आणि शिक्षेच्या कालमर्यादेपेक्षा जास्त) काम करण्यास भाग पाडले जात असल्याचे म्हटले आहे. कामाच्या योग्य सोयी आणि वेळेवर व्यवस्था ही त्याची प्रमुख कारणे आहेत. या सर्व मूलभूत अधिकारांपासून ते वंचित आहेत. त्याचा फटका बेस्ट बसचालकांच्या दैनंदिन जीवनावर स्पष्टपणे दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे दररोज लाखो लोकांचा जीव धोक्यात घालून अमानुष छळ होण्याची शक्यता असल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. न्याय्य कार्यवाहीसाठी सुओ-मोटो अंतर्गत तक्रार पत्राद्वारे आयोगासमोर ही तक्रार करण्यात आली आहे.

मुंबईतील कुर्ला येथे घडलेली घटना भीषण होती. ब्रेक फेल भरधाव बसने अनेक वाहनांना आणि पादचाऱ्यांना चिरडलं. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून ४९ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण मुंबई हादरली. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुर्ला बेस्ट बस अपघातातील आरोपी संजय मोरेने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, त्याला ऑटोमॅटिक वाहन चालवण्याची सवय नसल्यामुळे गोंधळ झाला. त्याने स्पष्ट केले की, क्लच नसलेल्या गाड्या चालवणं त्याच्यासाठी गैरसोयीचं होतं, आणि बस चालवताना त्याने क्लच समजून अॅक्सिलेरेटर दाबला. संजय मोरेला ड्रायव्हिंगचा अनुभव असला तरी, त्याने कधीही ऑटोमॅटिक बस चालवली नव्हती, आणि 1 डिसेंबरला त्याने पहिल्यांदाच ऑटोमॅटिक बस चालवली होती. तपासणीत बसचे ब्रेक्स काम करत असल्याचं निष्पन्न झालं आहे.

मुंबईतील कुर्ला बेस्ट बस घटनेबाबत मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल
Kurla Bus Accident: क्लच समजून एक्सीलेरेटर दाबलं; Sanjay More याचा पोलिसांना जबाब
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com