मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना दणका; किशोरी पेडणेकरांच्या 4  सदनिका ताब्यात घेण्याचे आदेश

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना दणका; किशोरी पेडणेकरांच्या 4 सदनिका ताब्यात घेण्याचे आदेश

किशोरी पेडणेकर यांनी त्यांची कंपनी कीश कॉर्पोरेशनच्या माध्यमातून वरळी गोमाता जनता एसआरए प्रकल्पातील 4 सदनिका बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतल्या होत्या

किशोरी पेडणेकर यांनी त्यांची कंपनी कीश कॉर्पोरेशनच्या माध्यमातून वरळी गोमाता जनता एसआरए प्रकल्पातील 4 सदनिका बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतल्या होत्या अशी तक्रार सोमय्यांनी केली होती. एसआरएने सोमय्यांची ही तक्रार स्वीकारत हे चार गाळे ताब्यात घेत असल्याने आदेश दिलेत. पुढील 4 दिवसांत मुंबई मनपा अधिकारी हे गाळे रिकामे करून एसआरएच्या ताब्यात देतील असं सोमय्यांनी म्हटलंय

SRA अधिकार्‍यांनी किशोरी पेडणेकर, किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस आणि बेनामी सहकारी विरुद्ध कलम 3A अंतर्गत निष्कासन Eviction करण्याचे आदेश दिले आहे, पेडणेकर परिवाराने वरळी गोमाता जनता एस आर ए येथील 4 सदनिकांवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याची माझी तक्रार होती. पुढील आठवड्यात निष्कासन होणार असं सोमय्यांनी ट्विट करत म्हटले आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com