दिलीप वळसे पाटील यांच्या मुलीकडून अमोल कोल्हेंचं अभिनंदन; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

दिलीप वळसे पाटील यांच्या मुलीकडून अमोल कोल्हेंचं अभिनंदन; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होती. या लढतीत शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे विजयी झाले.

याच पार्श्वभूमीवर आता दिलीप वळसे पाटील यांच्या मुलीकडून अमोल कोल्हे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. शिरुरमधील विजयानंतर पूर्वा वळसेंकडून कोल्हेंना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 'डॉ अमोल कोल्हेंचा दणदणीत विजय; मनःपूर्वक अभिनंदन' असा मजकूर टाकत सोशल मीडीयावर शेअर करत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पूर्वा वळसेंनी अमोल कोल्हेंना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com