साता समुद्रापार स्वीडनमध्ये ढोल-ताशा पथकाचा डंका

साता समुद्रापार स्वीडनमध्ये ढोल-ताशा पथकाचा डंका

राज्यभरात गणेश विसर्जनाचा उत्साह सुरु असताना सात समुद्रापार देखिल गणेश चतुर्थीची धूम पाहायला मिळाली.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्यभरात गणेश विसर्जनाचा उत्साह सुरु असताना साता समुद्रापार देखिल गणेश चतुर्थीची धूम पाहायला मिळाली. स्वीडनमध्ये पहिल्यांदा ढोल-ताशा पथकाची सुरुवात करण्यात आली आहे. स्वराज्य ढोल-ताशा पथक असे या पथकाचे नाव आहे. स्वीडनमधील स्टॉकहोममध्ये अभिनय सरकटे यांनी ढोल-ताशा पथकाची स्थापना केली. तसेच गोथेनबर्गमध्ये प्रणाली मानकर यांनी त्यासाठी प्रयत्न केले.

गणेश विसर्जनाच्या उत्सवानिमित्त या पथकाने सलग 2 तास परफॉर्मन्स केला. भाविकांनी त्याला जोरदार प्रतिसाद देत, बाप्पा मोरयाच्या गजरात, ढोल-ताशाच्या तालावर ठेका धरला. स्वीडिश ध्वजाच्या निळ्या आणि पिवळ्या रंगांची छटा असलेल्या पथकाच्या खास पेहरावाने स्वीडिश भूमीवर आपल्या भारतीय परंपरेचा सुंदर अनुभव दिला.

आता परदेशांमध्येही वास्तव्यास असणारे भारतीय आपल्या संस्कृतीची झलक दाखवताना दिसत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com