अमरावतीत केंद्र सरकार विरोधात काँग्रेस आक्रमक; अदानीला अटक करण्याची मागणी

अमरावतीत केंद्र सरकार विरोधात काँग्रेस आक्रमक; अदानीला अटक करण्याची मागणी

अमरावतीत केंद्र सरकार विरोधात काँग्रेस आक्रमक

सुरज दहाट,अमरावती

अदानी उद्योग समूहातील गैर कारभाराची केंद्रातील मोदी सरकारने तातडीने चौकशी करावी या गैरकारभाराची चौकशी संयुक्त संसदीय समितीतर्फे अथवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाच्या देखरेखी खाली करण्यात यावी, एलआयसी व एसबीआय मधील जनतेचे पैसे बुडण्याची भीती गुंतवणूकदारांच्या पैशाला संरक्षण मिळावे यासाठी सरकारने योग्य निर्णय घ्यावे या मागणीसाठी अमरावती शहरातील श्याम चौकातील स्टेट बँक समोर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकार विरोधात आंदोलन केले.

यावेळी अदानीला अटक करण्याची मागणी करण्यात आली,केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्यात यावेळी बॅंकेसमोर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com