कर्नाटकचा मतसंग्राम! भाजप विरुध्द कॉंग्रेस; कोणाचे पारडे ठरणार जड?

कर्नाटकचा मतसंग्राम! भाजप विरुध्द कॉंग्रेस; कोणाचे पारडे ठरणार जड?

कर्नाटक निवडणुकीसाठी मतमोजणी आज होणार आहे. कर्नाटकात 73.19 टक्के इतके उल्लेखनीय मतदान झाले.

बंगळूरू : कर्नाटक निवडणुकीसाठी मतमोजणी आज होणार आहे. कर्नाटकात 73.19 टक्के इतके उल्लेखनीय मतदान झाले. मुख्य विरोधक भाजप आणि काँग्रेस यांच्यात प्रचारादरम्यान जोरदार शाब्दिक युद्ध झाले. आता या निवडणूकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

224 सदस्यीय कर्नाटक विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान पार पडले. हे राज्य दक्षिण भारतात भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, अनेक एक्झिट पोलमध्ये संभाव्य त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, काँग्रेसला स्वतंत्रपणे बहुमत मिळू शकते, असा अंदाजही काहींनी व्यक्त केला. पॉल डायरीच्या अंदाजानुसार, भाजपला 85-104 जागा मिळण्याची शक्यता आहे. आणि कॉंग्रेसला 57-105 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर, जेडीएसला 24-27 जागा मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत जेडीएस किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com