काँग्रेसचं ठरलं ! चंद्रपुरात लोकसभेसाठी उमेदवार निश्चित, वडेट्टीवार नाही 'हे' असणार उमेदवार

काँग्रेसचं ठरलं ! चंद्रपुरात लोकसभेसाठी उमेदवार निश्चित, वडेट्टीवार नाही 'हे' असणार उमेदवार

लोकसभा निवडणुकीची बिगुल बाजल्यापासून देशासह राज्यात सर्वंच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे.
Published by :
shweta walge

लोकसभा निवडणुकीची बिगुल बाजल्यापासून देशासह राज्यात सर्वंच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यातच भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसही आता नावे जाहीर करत आहेत. त्यातच आता चंद्रपूरचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसने प्रतिभा धानोरकर यांना चंद्रपुरातून उमेदवारी जाहीर केली आहे.

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठीची पाचवी यादी जाहीर केली आहे, या यादीत काँग्रेसने चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. प्रतिभा धानोरकर या वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळू धानोरकर यांचा चंद्रपूर मतदारसंघातून विजय झाला होता. महाराष्ट्रातून काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक जिंकलेले ते एकमेव खासदार होते, पण 30 मे 2023 ला बाळू धानोरकर यांचं निधन झालं.

काँग्रेसचं ठरलं ! चंद्रपुरात लोकसभेसाठी उमेदवार निश्चित, वडेट्टीवार नाही 'हे' असणार उमेदवार
आढळराव पाटील घड्याळ चिन्हावर लढणार? 'महागाईची' होळी पेटवल्यानंतर अमोल कोल्हे म्हणाले, "२० वर्ष..."

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून विजय वडेट्टीवार यांच्या नावाचीही चर्चा होती. विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनीही इथून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा थेट सोशल मीडियावरून व्यक्त केली होती. पण काँग्रेसने प्रतिभा धानोरकर यांना चंद्रपूर लोकसभेचं तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com