Gujarat Secretariat Caught Fire
Gujarat Secretariat Caught FireTeam Lokshahi

गुजरातमधील सचिवालयाला आग; काँग्रेस म्हणतेय 'जळतायत त्या भ्रष्टाराच्या फाईल्स!'

काँग्रेसच्या ऑफिशियल ट्वीटर अकाऊंट वरून हा व्हिडीओ पोस्ट करत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
Published on

गुजरातमधील जुन्या सचिवालयाला आग लागल्याची दृश्य समोर आली आहेत. या दृश्यांमध्ये इमारतीतून धूर बाहेर येत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, काँग्रेसच्या ऑफिशियल ट्वीटर अकाऊंट वरून हा व्हिडीओ पोस्ट करत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

Gujarat Secretariat Caught Fire
"...तुम्ही राज्य चालवण्याच्या लायकीचेच नव्हता" प्रकाश महाजनांचा ठाकरेंवर घणाघात

ट्वीटमध्ये काय म्हटलंय काँग्रेसने?

'...आणि गुजरातमध्ये सरकारी फाइल्स जळू लागल्या. गुजरातच्या जुन्या सचिवालयात आज आग लागली. निवडणुकीपूर्वी लागलेली आग भाजपला सत्तेत जाण्याचे भान असल्याचे दिसून येते. या दहशतीत 27 वर्षांच्या भ्रष्टाचाराच्या फाइल्स जळत आहेत.' असं काँग्रेसने या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com