मुक्ताताईंचे स्वप्न भाजपा नाही काँग्रेस पूर्ण करणार - काँग्रेसचे कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर
Admin

मुक्ताताईंचे स्वप्न भाजपा नाही काँग्रेस पूर्ण करणार - काँग्रेसचे कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर

विधान परिषद निवडणुकांनंतर आता पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

विधान परिषद निवडणुकांनंतर आता पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे. कसबा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. आज काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. कसब्यात काँग्रेसकडून रविंद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

आज सकाळी साडेनऊ वाजता कसबा गणपती व दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन कॉंग्रेसचा उमेदवार अर्ज भरण्यास जाणार असल्याचे शहर कॉंग्रेसच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. महाविकासआघाडी आणि भाजपाचे उमेदवार आज साडेनऊ वाजता आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर उमेदवारी मिळाल्यानंतर रविंद्र धंगेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी आणि कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या जिवावर मी नक्की निवडून येईल. मुक्ताताईंचे स्वप्न भाजप नाही काँग्रेस पूर्ण करणार आहे. त्या कामासाठी पुणेकर मला साथ देतील. असे ते म्हणाले.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, गेली 30 वर्षे मी समाजाचं काम केलं. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मी काम केलं आहे. जनतेच काम कारण हे माझ कर्तव्य आहे. मी सर्वाना न्याय देण्याचं काम करतो आणि ही माझी राजकीय जीवनात जमेची बाजू आहे.असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com