विधानसभेतून सावरकरांचा फोटो हटवणार, काँग्रेसचा धक्कादायक निर्णय, चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक

विधानसभेतून सावरकरांचा फोटो हटवणार, काँग्रेसचा धक्कादायक निर्णय, चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक

कर्नाटक विधानसभेतून सावरकरांचा फोटो हटवण्याचा काँग्रेसचा निर्णय, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक, उद्धव ठाकरे यांना प्रश्न
Published by :
shweta walge
Published on

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांच्या नेतृत्वात काँग्रेस सरकारनं बेळगावच्या सुवर्ण सौधा विधानसभेतून वीर सावरकरांचा फोटो हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून राज्याच राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निषेध व्यक्त करत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांची एक्सवरील पोस्ट

कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अत्यंत निंदनीय आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अपमान करणारा आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या यातना, त्यांचे बलिदान आणि त्यांचे विचार यांची अवेहलना करण्याचा काँग्रेसचा हा डाव आहे.

सत्तेसाठी लाचार झालेले आणि मतांसाठी हिंदुत्ववादी भूमिका सोडलेले उद्धव ठाकरे याचा निषेध करणार की नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसणार? काँग्रेससोबत आघाडी करताना ठाकरे यांनी सावरकरांच्या विचारांना मूठमाती दिली आहे. त्यामुळेच आज त्यांना ‘टीपू सेना’ म्हणण्याची वेळ आली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार अमर आहेत, त्यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना इतिहास कधीही माफ करणार नाही.

दरम्यान,  वीर सावरकर यांचं कर्नाटकसाठी कोणतंही योगदान नाही असं सरकारला वाटत असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वातील सरकारनं विधानसभेत सावरकरांचा हा फोटो लावला होता. 

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com