Harshvardhan Sapkal  : काँग्रेस हर्षवर्धन सपकाळ आज बिहार दौऱ्यावर,मोर्चात सहभागी होणार नाहीत

Harshvardhan Sapkal : काँग्रेस हर्षवर्धन सपकाळ आज बिहार दौऱ्यावर,मोर्चात सहभागी होणार नाहीत

महाविकास आघाडी आणि मनसे यांनी एकत्रित येत उद्या निवडणूक आयोगाच्या विरोधात सत्याचा मोर्चा काढण्याचं जाहीर केलं आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • काँग्रेस हर्षवर्धन सपकाळ आज बिहार दौऱ्यावर

  • हर्षवर्धन सपकाळ मोर्चात सहभागी होणार नाहीत

  • काँग्रेस पक्षामार्फत इतर पदाधिकारी, प्रवक्ते सहभागी होणार...

महाविकास आघाडी आणि मनसे यांनी एकत्रित येत उद्या निवडणूक आयोगाच्या विरोधात सत्याचा मोर्चा काढण्याचं जाहीर केलं आहे. हर्षवर्धन सपकाळ आज बिहार दौऱ्यावर जाणार आहेत आजच्या मोर्चात मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार नाहीयत. काँग्रेस पक्षामार्फत इतर पदाधिकारी, प्रवक्ते सहभागी होणार आहे. सपकाळ यांची याबाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती मिळतेय.

या मोर्चाला मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे , राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार , काँग्रेस नेते, डाव्या पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. मोर्चा दुपारी 1 ते 4 यावेळेत निघणार आहे. मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी मोर्चाला येणाऱ्यांसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com