Admin
ताज्या बातम्या
नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसनं केली सुधीर तांबेंना उमेदवारी जाहीर
नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसनं सुधीर तांबेंना उमेदवारी जाहीर केली आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसनं सुधीर तांबेंना उमेदवारी जाहीर केली आहे. सुधीर तांबे यांचे पुत्र आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे डॉ. सत्यजीत तांबे यांनाही उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, अखेर काँग्रेसकडून सुधीर तांबेंना उमेदवारी जाहीर केली आहे.
काँग्रेसनं याबाबत एक पत्रक जाहीर केलं आहे. बाळासाहेब थोरात आजारी असल्याने साध्या पद्धतीने भरणार अर्ज भरणार असल्याची माहिती त्यांनी दिली.सुधीर तांबे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. ते मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
Admin