काँग्रेसमध्ये नाराज असलेले काँग्रेस नेते आबा बागुल आजपासून रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारात सक्रिय

काँग्रेसमध्ये नाराज असलेले काँग्रेस नेते आबा बागुल आजपासून रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारात सक्रिय

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता काँग्रेसमध्ये नाराज असलेले काँग्रेस नेते आबा बागुल आजपासून रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून आबा बागुल काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

तसेच काही दिवसांपूर्वी आबा बागुल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आता दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंशी चर्चा झाल्यानंतर आबा बागुल यांची नाराजी दूर झाली असल्याची माहिती मिळत आहे. यातच आज आबा बागुल रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com