'सरकारविरोधात बोललं की जीवे मारण्याचे प्रयत्न होतात; काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची सत्ताधाऱ्यांवर टीका
Admin

'सरकारविरोधात बोललं की जीवे मारण्याचे प्रयत्न होतात; काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची सत्ताधाऱ्यांवर टीका

परभणीचे ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी काल अप्रत्यक्षपणे आपल्या नेत्याला घरचा आहेर देत टीका केली होती

परभणीचे ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी काल अप्रत्यक्षपणे आपल्या नेत्याला घरचा आहेर देत टीका केली होती. मात्र यावरून परभणीचे खासदार जाधव आता चांगलेच चर्चेत आलेत. यावर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना छेडले असता त्यांनी जाधव यांनी आपल्या भावना जाहीरपणे मांडायला नको होत्या. त्यांनी वैयक्तिक जाऊन हे बोलायला हवं होतं असं मत माजी मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केलय.

सरकारच गुणगान केलं तर बरं आहे अन्यथा विरोधात बोललं तर जीवे मारण्याचे प्रयत्न होतायत. जे आणीबाणीच्या काळात घडलं नाही ते आता होतंय या शब्दात काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलीय. पानसरे कलबुर्गी सारख्या हत्या झालेल्या विचारवंताचा नुसताच तपास सुरू आहे त्याच पुढे काहीच होत नाहीये, अशा शब्दात चव्हाण यांनी सताधाऱ्यावर टीका केलीय. नांदेडमध्ये संगीत शंकर दरबार सोहळ्यात बोलताना अशोक चव्हाण यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र हिरावले जात असल्याची टीकाही सरकारवर केलीय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com