भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते कृष्ण कुमार पांडेंचे निधन

भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते कृष्ण कुमार पांडेंचे निधन

भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते कृष्ण कुमार पांडेंचे निधन झाले आहे.

भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते कृष्ण कुमार पांडेंचे निधन झाले आहे. झेंडा तुकडीचे संचलन करताना त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळत आहे. संचलन केल्यानंतर श्वास घेण्यास त्यांना त्रास होऊ लागला. दवाखान्यात उपचार घेताना पांडेंचं निधन झाले आहे.

कॅम्पमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, दिग्विजय सिंह, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई, एच. के. पाटील, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, संदेश सिंगलकर, महेंद्र सिंह वोहरा यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com